बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

पटना | गेल्या काही दिवसापासून जम्मू -काश्मीरमध्ये कामानिमित्त गेलेल्या बिहारी कामगारांवर सातत्याने हल्ले होत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या प्रकारे बिहारींना सतत मारलं जात आहे, त्यानंतर बिहारचं राजकारण तापलं आहे. यावर विरोधी पक्ष या घटनेवर आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अशातच आता भाजप आमदाराने केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

बिहारचे भाजप आमदार ज्ञानेंद्र सिंह ग्यानू यांनी मंगळवारी जम्मूमध्ये राहणाऱ्या बिहारींसाठी मोफत AK-47 रायफल्सची मागणी केली. जर बिहाऱ्यांना AK-47 रायफल्स दिल्या तर बिहारी आपलं सौरक्षण करू शकतील, असं ज्ञानेंद्र सिंह ग्यानू यांनी म्हटलं आहे.

सोमवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी देखील याच मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काश्मीर 15 दिवसांसाठी बिहारींच्या ताब्यात द्या, मग बघा काय होतंय, असं जीतन राम मांझी म्हणाले होते. त्यानंतर देखील बिहारचं राजकारण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं होतं.

दरम्यान, दहशतवादी विशेषतः काश्मिरी नसलेल्या मजुरांना येथे लक्ष्य करत आहेत. रविवारीच दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये बिहारमधील 3 जणांना गोळ्या घातल्या. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. कुळगावच्या लारान गंजीपोरामध्ये देखील बिहारी कामगारांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

“राहुल गांधींना ड्रॅग्जचं व्यसन, ते ड्रॅग्ज तस्करी देखील करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More