बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साईंचं सोनं संकटकाळात उपयोगी येत असेल तर भक्तांना आनंद होईल”

शिर्डी |  देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. मात्र शिर्डी संस्थानाने चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मकता दर्शवली आहे.

कोरोनाच्या संकट काळात जर साईबाबा देवस्थानाचं सोनं जर देशाच्या उपयोगी येत असेल तर आम्हाला आणि साई भक्तांना त्याचा आनंद होईल, असं साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली आहे. टाईम्स नाऊला त्यांनी प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं.

केंद्र सरकारने आमच्या सूचनेचा विचार करावा त्याचबरोबर एखादी स्किम देऊन देवस्थानाला योग्य तो मोबदला मिळेल, याची काळजी घ्यावी, असं देखील डॉ. हावरे यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे सध्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी तसंच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

दरम्यान, चव्हाण यांच्या सल्ल्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी घातली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहेत, म्हणून त्यांनी अश्या प्रकारची मागणी केली आहे, असं काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी म्हटलं आहे. दुसरीकडे माझ्या मागणीचा मोदी भक्तांनी आणि भाजप समर्थकांनी वेगळा अर्थ घेतल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More