दिवस गोविंदांचा… मात्र चांदी झाली कलाकारांची

मुंबई | मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी आयोजकांनी मनोरंजन कार्यक्रमांवर लाखो रूपये खर्च केले. मात्र गोंविदांचा वापर फक्त प्रेक्षक म्हणून केला, असा आरोप मुंबईतील गोविंदा मंडळांनी केला आहे.

राजकीय आयोजक असलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदांपेक्षा कलाकारांना आणि नाचगाण्यांच्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले. चढलेल्या गोविंदांना कलाकारांसाठी उतरवण्यात आले. अनेक ठिकाणी मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीबद्दलचा आक्षेप मंडळांनी गोविंदा समन्वय समितीकडे नोंदवला आहे. 

दरम्यान, दहीहंडीचा हिरो असणाऱ्या गोविंदाला 5-7 हजार रुपये टेकवण्यात आले, तर तिथंच कलाकारांवर 40 हजार ते 5 लाखांपर्यंतचे मानधनाचा खर्च देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

-…हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते?, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं

-न्यायालयाचा एक निर्णय अन् छगन भुजबळांना मिळाला मोठा दिलासा

-थोडं थांबा… मग मीच बघतो कसं काम होत नाही ते- शरद पवार

-काँग्रेसमध्ये फूट नाही; राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील- अमरिंदर सिंग

-राम कदमांचा आणखी एक प्रताप; गोविंदांना दहीहंडी फोडू दिली नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या