लादेनच्या ‘या’ मुलाची माहीती द्या, 7 कोटी मिळवा

न्यूयाॅर्क | ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याचा पत्ता सांगणाऱ्याला सुमारे 7 कोटी रुपये बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.

वडील ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या उद्देशाने हमजा अमेरिका आणि सहकारी देशांवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बक्षिसाची रक्कम जाहीर करताना सांगितलं.

लादेन याची अल कायदा ही दहशतवादी संघटना गेल्या काही काळापासून शांत आहे असे भासत असले तरी देखील हा आत्मसमर्पणाचा भाग नसून हा डावपेचाचा भाग असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी नाथन सेल्स यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, हमजाची पत्नी इजिप्तची आहे. ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलांना सौदी अरबमध्ये माजी राजकुमार मोहम्मद हिन नायेफ यांनी आश्रय दिला. 

महत्वाच्या बातम्या-

-पुलवामा हल्ल्याच्या 2 आठवड्यानंतर पुतीन यांचा मोदींना फोन; वाचा काय म्हणाले

भारताचा ढाण्या वाघ आज मायदेशी परतणार, वाघा बाॅर्डवर वैमानिक अभिनंदन यांच स्वागत होणार?

-1980 ते 2014 पर्यंत मराठा समाज आरक्षणाबाबत शांत का होता? हायकोर्टाचा सवाल

राजू शेट्टींना 2 जागा तर मनसे राष्ट्रवादीच्या कोट्यातून; काँग्रेसचा नवा फाॅर्म्युला!

सुषमा स्वराज इस्लामिक देशांच्या ‘प्रमुख अतिथी’, पाकिस्तानचा जळफळाट