बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या”; ‘या’ मुख्यमंत्र्यांची महत्वाची मागणी

जयपूर | राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काळाबाजार केलेला पाहायला मिळत आहे. अशातच बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

बोगस लसीकरणाविषयी अशोक गेहलोत यांनी ट्विट करत म्हटलं की, मुंबईत बनावट लसीकरण झाल्याच्या बातम्या येत आहेत, हे चिंताजनक आहे. त्याआधी बहुतांश ठिकाणी बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्याचे प्रकार घडले आहेत. अशा टोळया लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. केंद्र सरकारनं तात्काळ अध्यादेश आणून अशा गुन्हेगारांसाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली पाहिजे.

मुंबईत कांदिवली भागात रहिवाश्यांची लसीकरणामध्ये फसवणूक झाली आहे. खासगी रुग्णालयाच्या नावाखाली लसीकरण शिबीर आयोजित करुन रहिवाश्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पाच जणांना अटक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात येत आहे. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. अशातच सर्वांना खबरदारी बाळगण्याची सूचना केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

लग्नानंतर अनैतिक प्रेमसंबंध ठेवणं पडलं महागात; आता दोघींसोबत दिवस वाटुन राहावं लागणार

दिलासादायक! कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पूर्णपणे अनलॉक; चित्रपटगृह, मॉल्स यांसह सर्व आस्थापना होणार सुरू

चितळे बंधूंना 20 लाखांची खंडणी मागणाऱ्यांना क्राईम ब्रांचने अशा प्रकारे सापळा रचत केली अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं केलं कौतुक, म्हणाले…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More