पुणे | मातंग समाजाला स्वतंत्र 8 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी देण्यात यावा. मातंग समाजाच्या विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारावे, या मागण्यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, अण्णा भाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या–
-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?
-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन
-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे
-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!
-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील