बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला सुत्र द्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो- देवेंद्र फडणवीस

पुणे |  ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापताना आहे. पावसाळी अधिवेशनातही ओबीसी आरक्षणावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. अशातच पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे सुत्र द्या असं म्हटलं आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करत नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इम्पिरीकल डेटा गोळा करणं हे 4 महिन्यांचं काम आहे. हे काम सहज होऊ शकणारं आहे. मी हेच म्हटलं की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवतो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला आव्हान दिलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलेल्या आव्हानावर सत्ताधारी पक्षांकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

“ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू आहे”

…म्हणून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं – देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More