महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

कणकवली | महाराष्ट्रातील मराठी जनतेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाती एकदा सत्ता द्यावी. त्यांचे सर्वार्थाने भले केल्याशिवाय ते राहणार नाहीत, असं मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटलं आहे. ते कणकवली मधील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज ठाकरेंनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही काम करत नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने ते करत आहेत, असं उपरकर यांनी म्हटलं. 

उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन राज ठाकरेंनी त्यांना ठणकावले आहे. त्यांच्या व्यासपीठावर गेलेल्या राज ठाकरे यांनी मराठी माणसाची भूमिका स्पष्ट केली, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मनसेने पक्ष स्थापनेपासून आपली भूमिका सोडली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर