बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अथवा आम्हाला विष पिऊन मरु द्या- उदयनराजे भोसले

मुंबई |  राज्यात गेल्या काही वर्षांपासून एक विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. गेले अनेक महिने सर्वाेच्च न्यायालयात याची सुनावणी येते आणि पुढची तारीख दिली जाते. या विषयावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी परत परत नाराजी व्यक्त केली होती. शरद पवारांची याबाबत भेटही घेतली होती. 8 मार्चला सुनावणी होणार होती ती सुनावणी पुढे ढकलत 15 मार्चला होणार आहे. यावरुन उदयनराजे भोसले आपल्या ट्विटरवर एक पोस्ट लिहत आक्रमक झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुण निराशेच्या गर्तेत आहेत. ‘आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या’, असं भोसले यांनी म्हटलं आहे.

जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर मराठा आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हातात घ्या. कोरोनाने तुम्हाला भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ शेकडो वर्षे अन्यायविरुध्द झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निकाल लावा, नाहीतर आम्हाला हे जमणार नाही असे जाहीर करुन खुर्च्यां खाली करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे एसईबीसी पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएस लागू करण्याचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे एसईबीसीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करायचा ही कसली नीती आहे? मराठा समाजाने तुम्हाला एवढी वर्षे सत्ता दिली त्याचे तुम्ही असे पांग फेडत आहात का? राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नसल्याने मी स्वत: शरद पवार, उध्दव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या भेटी घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितली आहे, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी, विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये”

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात; पाहा व्हिडीओ

भाजपने चार वर्षापुर्वी तिकीट कापलेले तीरथ सिंह उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री!

…म्हणून शिवराज सिंह चौहानांना ‘पावरी हो रही है’ चा मोह आवरला नाही

‘नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार पण…’; अजित पवारांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More