बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलत द्या; ‘या’ भाजप खासदाराचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

मुंबई | भारतातील कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. हळूहळू या संसर्गाचा परिणामही कमी होत आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला असल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना एक विस्तृत पत्र लिहून मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्य सरकारांना अध्यादेश जारी करून ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहिर करा. त्यांना दुकान, व्यापार आस्थापना उघडण्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना पत्रातून केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत करण्याकरिता आपल्या सूचना लक्षात घेऊन सर्व राज्य सरकारांना तसे निर्देश द्यावे अशी विनंती गोपाळ शेट्टी यांनी पत्रात शेवटी नमूद केली आहे.

दरम्यान, दोन डोस घेतलेल्या नागरिकांची ओळख सहज रित्या करता यावी म्हणून केंद्र सरकारने अशी एक विशेष तांत्रिक व्यवस्थाही तयार करावी. असंही गोपाळ शेट्टी यांनी पत्रात म्हटलं. दोन लस घेतलेल्यांना हॉटेल, मॉलमध्ये, प्रवेशांना विशेष लाभ दिल्यामुळे लसीकरण न करणारे शेकडो नागरिक लसीकरणासाठी पुढे येऊन देश सुरक्षेत सहभागी होतील, असंही शेट्टींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! बुलडाण्यातील रूग्णालयात एकाच कोरोना रुग्णाला दिले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेसोबत अफेअरच्या चर्चांवर अलायानं केला खुलासा, म्हणाली….

“होय, मी धमकी देतोय! भाजप नेते मंचावर आले तर एक एकाचे बक्कल्स काढले जातील”

चिंताजनक! डेल्टा प्लसनंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय ‘हा’ नवा धोका

…..अन्यथा ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल – डॉ. अजित नवले

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More