बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमदाराच्या मुलीला थार गाडी द्या’; सनी देओलचं थेट आनंद महिंद्रांना पत्र

चंदीगड | महिंद्रा गृपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा मोठे दिलदार व्यक्ती समजले जातात. क्रिडा क्षेत्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे. एखाद्या खेळाडूने केलेली कामगिरी त्यांनी आवडली की ते लगेच खेळाडूला गाडी भेट देतात. सोशल मीडियावर देखील ते अॅक्टिव्ह असतात. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हीने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकवताच त्यांनी तिला थार गाडी गिफ्ट केली होती. त्यातच आता भाजपचे खासदार आणि अभिनेता सनी देओल आणि आनंद महिंद्रा यांच्याकडे अजब मागणी केली आहे.

सनी देओल यांनी लिहिलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय. सुजानपूर मतदारसंघात सध्या दिनेश सिंग ठाकूर हे आमदार आहेत. त्यांच्या मुलीला थार गाडी गिफ्ट करा, अशी मागणी भाजप खासदार सनी देओल यांनी केली आहे. सनी देओल यांनी महिंद्रा गृपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे. गाडी लवकरात लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करावी, असं देखील या पत्रात म्हटलं आहे.

आमदार दिनेश सिंग ठाकूर यांच्या मुलीने थार गाडी बुक केली होती. मात्र ही गाडी आऊट ऑफ टर्न देण्यासाठी खासदार सनी देओल यांनी मागणी केल्याचं सांगण्यात आलं आहे. गाडी आमदारांच्या मुलीला लवकरात लवकर मिळावी म्हणून त्यांनी ही शिफारस केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या या पत्रानंतर आता पंजाबमधील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

पंजाबमधील शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे, त्यांच्यासाठी पत्र लिहावं वाटलं नाही, असा आरोप सनी देओल यांच्या मतदार संघातील लोकांनी केला आहे. सनी देओल खासदार झाल्यानंतर एकदाही मतदार संघात फिरकले नाहीत, असा आरोप सातत्यानं केला जात आहे. सनी देओल बेपत्ता असल्याचे बॅनर देखील पंजाबमध्ये लावण्यात आले होते.

थोडक्यात बातम्या-

धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी

‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

“मंत्री यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला”

‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा

के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More