बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार बनवून दाखवतो”

कोल्हापूर | काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधवयांच्या  निधनाने उत्तर कोल्हापूर मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. भाजपकडून या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूरात भाजपचा आमदार नाही, अशी खंत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी थेट काँग्रेसचा उमेदवार भाजपला देण्याची ऑफर काँग्रेसला दिली आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बोलताना काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो, असं म्हटलं आहे. काँग्रेसकडून दिवंगत नेते चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार भाजपला देण्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास अजित पवारांचा विरोध आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास 30 रूपयांनी इंधनाचे दर कमी होतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी याअगोदरही चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीने निवडणुक लढवायची तयारी दाखवली तर उमेदवारी देऊ, असं वक्तव्य केलं होतं. या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाने काँग्रेसला पाठींबा देण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना आता…”

मोठी बातमी! केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले, ‘या’ 2 अटी मात्र कायम

मोठी बातमी! युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाचं धक्कादायक पाऊल

सर्वसामान्यांना धक्का, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा ताजे दर

‘मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणे’; व्हिडीओ शेअर करत मनसेची तुफान टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More