बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार मोदी सरकारलाच द्या- सक्षणा सलगर

मुंबई | टोकियो ऑलिम्पिकमुळे सध्या देशभरात खेलमय वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. यातच मोदी सरकारने शुक्रवारी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असं केलं आहे.

क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचं नाव बदलण्यात आल्यानं विरोधकांनी मोदी सरकराला धारेवर धरलं आहे. अनेक बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर टीका केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी नेत्या सक्षणा सलगर यांनी देखील पुरस्काराच्या मुद्यावरुन मोदी सरकारला टोला लगावला आहे. पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार मोदी सरकारलाच देण्यात यावा, असं सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे.

सक्षणा सलगर ट्वीट करत म्हणाल्या की, मूळ प्रश्नावरुन ध्यान इतरत्र वळवण्याच्या खेळात यशस्वी झाल्याबद्दल पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार मोदी सरकारलाच देण्यात यावा. सक्षणा सलगर यांनी लगावलेल्या या टोल्यावर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्याची माहिती दिली होती. जनतेने केलेल्या मागणीमुळे पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

देशात 4 लाख 12 हजार123 सक्रीय रूग्ण तर…; वाचा ताजी आकडेवारी

…अन् तिचं स्वप्न अधूरंच राहिलं; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला विकावं लागतंय पार्किंग तिकीट!

जेवढ्या गाई तेवढचं तूप विकतो, आम्ही रामदेव बाबांसारखं करत नाही- विजय वडेट्टीवार

आनंद महिद्रांनी नीरज चोप्राची केली बाहुबलीशी तुलना; म्हणाले….

फडणवीसांकडून युतीच्या चर्चेला पूर्णविराम! म्हणाले, 2024 ला आम्ही…

अबब!!! सोन्याच्या दरात आज तब्बल 1 हजार रुपयांची घट; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More