बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी द्या’; राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची व्यापाऱ्यांना विनंती

जळगाव | देशात सुरु असलेल्या शेतकरी मोर्चाने 27 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ पुकारलं आहे. तरी देखील अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरु असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच त्यांनी व्यापाऱ्यांना आवाहन देखील दिलं आहे.

जळगावातील अनेक ठिकाणी बाजारपेठेचे मुख्य भाग असलेले महात्मा फुले मार्केट, टाॅवर चौक, गोलाणी मार्केट, नवी पेठ, रोज प्रमाणे सुरु होते. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तसेच त्यांनी व्यापारांना आणि दुकानदारांना आवाहन देत एक दिवस शेतकऱ्यांसाठी देण्याची मागणी केली.

अनेक लोकांनी नेत्यांच्या मागणीला नकार दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद रोखला गेला आणि दुकाने बंद करण्यात आली.

दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध देशात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. मात्र रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील. यात अनेक राष्ट्रीय पक्षांनी आणि संघटनांनी सहभाग घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?- गोपीचंद पडळकर

भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बाॅर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, फोटो व्हायरल

मुस्लिम लोकांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या बॅंड बाजासारखी झालीये- असदुद्दीन ओवैसी

HDFC बँकेचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी

काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More