बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली | देशभरात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आनंदासह उत्साहाचं वातावरण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 74 वर्ष पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्लावर ध्वजारोहण पार पडलं. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी आज आपल्या भाषणात अनेक विषयावर आपलं मत मांडलं.

पंतप्रधान मोदींनी देशातील आरोग्य, अर्थ, उद्योग क्षेत्राविषयी आपली भूमिका मांडली. देश गेल्या वर्षापासुन कोरोना महामारीसोबत लढत आहे, असं मोदी म्हणाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाने केलेल्या कामगिरीचंसुद्धा कौतुक केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील मुलींसाठी एक महत्वाची घोषणा केली. ज्या मुलींना सैन्यामध्ये आपलं भविष्य घडवायचं आहे त्या मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. याच पार्श्वभूमीवर तृतीयपंथियांनी आम्हालाही देशसेवा करण्याची मागणी केली आहे.

भारतीय लष्करात भरती होण्याचं आमचं सुद्धा स्वप्न आहे. देशासाठी आम्हालाही लढायचं आहे. आम्हालाही सैन्यात भरती करून देशसेवेची संधी द्यावी, अशी मागणी तृतीयपंथियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

दरम्यान, आपल्या देशात सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी योगदान देत आहेत. पण लष्करात हे प्रमाण कमी आहे. मला लाखो मुलींने इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश सुरू करण्यासाठी सरकार तत्पर आहे, असं नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल”

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते पण धुक्यात त्यांनी भलत्याच व्यक्तीचा हात धरला”

“महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम- दत्तात्रय भरणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More