बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लग्नाचं फुटेज द्या, 100 कोटी घ्या’; विकी-कतरिनाला सर्वात मोठी ऑफर

मुंबई | सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा रंगलेली दिसत आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाची (Katrina Kaif). येत्या 9 तारखेला ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहे. याची तयारी जोरदार असणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच लग्नाचा बोलबाला पहायला मिळत आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अशी ओळख बनलेली ही जोडी लवकरच लग्नगाठ (Marriage) बांधणार आहे. अवघ्या दोन दिवसांनी राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात ते दोघेही लग्न करणार आहेत. कतरिना व विकीने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठीही तगडी तयारी केली आहे.

विकी आणि कतरिनाच्या लगनाचे फोटो आणि व्हिडीओसाठी अनेक मोठमोठे चॅनेल पैसे मोजायला तयार आहेत. एवढंच नाहीतर आता त्यांच्या लग्नाच्या फुटेजच्या बदल्यात ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) चक्क 100 कोटी मोजायला तयार झाली आहे.

एका ओटीटी कंपनीनं विकी-कतरिनाला त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओच्या राइट्ससाठी (Photo video rights) मोठी रक्कम ऑफर केली आहे. आता ते दोघे ही ऑफर स्वीकारणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ अनाथ मुलाचं पालकत्व शिवसेना स्विकारणार- किशोरी पेडणेकर

खुशखबर! सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

‘…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाही’; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

“राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर”

अभिनेता इरफान खानच्या मृत्यूविषयी नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More