Top News खेळ

बबब… छप्पर फाडके पैसा!!! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला लागली जबरदस्त बोली

Photo Courtesy- Facebook/IPL

चेन्नई | बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई मध्ये सुरु आहे. या लिलावाची सध्या क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून बड्या क्रिकेटपटूंसोबत साऱ्या क्रीडाप्रेमींचं या लिलावाकडे लक्ष लागलं आहे.  तब्बल २९८ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपलं नशीब या लिलावात आजमावणार आहेत. या लिलावात ऑस्ट्रलियाच्या एका खेळाडूला लागलेल्या बोलीनं साऱ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत.

ग्लेन मॅक्सवेलला विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने विकत घेतलं आहे. त्याला १४ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. मॅक्सवेलची बोली २ कोटी रुपयांपासून सुरु झाली होती. राजस्थान व कोलकाता या दोन संघांनी बोलीची सुरुवात केल्यानंतर आरसीबी आणि सीएसकेने मॅक्सवेलची बोली पुढे नेली. शेवटी चेन्नईने माघार घेतल्याने आरसीबीने या बोलीत बाजी मारली.

ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी म्हणावी तेवढी चांगली झालेली दिसत नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात तो पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. पंजाबसाठी खेळताना त्याने १३ सामन्‍यात फक्‍त १०८ धावा केल्या होत्या. धक्कादायक बाब त्याला एकही षटकार मारता आला नव्हता. पंजाबने त्याला १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

२०१३ साली मुंबई इंडियन्सने त्याच्यावर मोठी बोली लावली होती, त्याआधी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. २०१४ साली किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला ताफ्यात सामील केलं होतं. २०१७ मध्ये त्याने पंजाबचं नेतृत्व देखील केलं होतं. मात्र चांगली कामगिरी नसल्याने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१८ आयपीएल वेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग झाला. २०१९ मध्ये त्याने विश्रांतीचा निर्णय घेतल्यानंतर २०२० मध्ये पुन्हा आपल्या पूर्वीच्या पंजाबचे त्याने प्रतिनिधित्व केले होते.

थोडक्यात बातम्या-

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

पूजाला होता ‘हा’ आजार, आई-वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती

टोल प्लाझा पुन्हा राज ठाकरेंच्या निशाण्यावर?; 21 फेब्रुवारीनंतर उचलणार हे पाऊल

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या