मुंबई । युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला आहे.
सात कोटींचा हा पुरस्कार असून हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरलेत. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भात घोषणा केलीये. 140 देशातील 12 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नावांमधून डिसले यांना विजेता घोषित करण्यात आलं.
पुरस्काराच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देणार असल्याचं रणजितसिंह डिसले यांनी सांगितलंय.
रणजितसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. डिसले यांच्या कामाची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
चिंताजनक! कोरोना रूग्णांमध्ये आढळली 2 नवी लक्षणं
तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय- उद्धव ठाकरे
कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार
रेखा जरे हत्येप्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानंच दिली सुपारी!
2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढणं; देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका