बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

DNB मेडिसीन परीक्षेत औरंगाबादमधील विद्यार्थ्याचं दैदीप्यमान यश!

औरंगाबाद | कोणत्याही ध्येयाचा पाठलाग करताना जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो. अशाच प्रकारे आपल्या मेहनतीच्या जोरावर औरंगाबदमधील दौैलताबादचे डॉ. अक्षय कचरू बर्डे यांनी डीएनबी परीक्षा पास होत दैदीप्यमान यश मिळवलं आहे. अक्षय बर्डे यांनी नवी दिल्ली येथून आपलं शिक्षण पुर्ण केलं.

अक्षय बर्डे यांनी आपलं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या बिडकिन शाळेत घेतलं आणि माध्यमिक शिक्षण सरस्वती भुवन बिडकीन येथे झालं आहे. त्यानंतर त्यांनी आपलं एमबीबीएसचं शिक्षण शासकीय वैद्यकीय महााविद्यालय घेतलं आणि डी. एन. बी. मेडिसिनची पदव्युत्तर पदवी शिक्षण त्यांनी नवी दिल्ली येथून पूर्ण केलं.

अभय बेर्डे हे सध्या औरंगाबादधील मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे कार्यरत आहेत. बेर्डे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी हे दैदीप्यमान यश मिळवलं. ग्रामीण भागातील मुलांनी आपल्या मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्या प्रयत्नांच्या जोरावर स्वप्न पुर्ण करत अक्षय बर्डे यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

दरम्यान, डीएनबी म्हणजे काय?, तर डीएनबी ही पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट डॉक्टरल पदविका आहे. एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर डीएनबीसाठी प्रवेश आणि एक्झिट लेव्हलची परीक्षा ‘एनबीई’ ही संस्था घेते. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या डॉ. विद्यार्थ्यांना शासकीय किंवा खासगी रुग्णालयात तीन वर्षांचं प्रशिक्षण आणि अनुभव घ्यावा लागतो. त्यानंतर परीक्षा द्यावी लागते.

थोडक्यात बातम्या- 

सेल्फीसाठी काहीही! आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी महिलेने मारले चक्क साडीतच पुशअप्स, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! कोरोनापासून वाचण्याचा उपाय सांगत त्यानं खाल्ला साप अन्…..

आयपीएलमधील ‘या’ विस्फोटक खेळाडूवर पुण्यात विनामास्कची कारवाई, भरावी लागली 500ची पावती

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्यांवर

‘…तर नवा पक्षही स्थापन करू’; खासदार संभाजीराजे भासलेंचंं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More