पणजी | देशाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरूवात झाली (Assembly Election Result 2022). पाच पैकी चार राज्यात भाजपचा (BJP) बोलबाला असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. गोव्यात सेना-राष्ट्रवादी पेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं मिळाली आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. तर संपूर्ण ताकदीने मैदानात उतरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फ्लॉप शो झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे 40 जागा असलेल्या गोवा विधानसभेत सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार गोव्यात शिवसेनेला (Shivsena) 0.25 टक्के मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादीला (NCP) सध्या 1.06 टक्के मतं मिळाली आहेत. तर या दोन्हीपेक्षा ‘नोटा’ला (NOTA) जास्त मतं मिळाली आहेत. 1.17 टक्के मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, शिवसेनेला गोव्यात पराभव स्विकारावा लागल्याने राज्यात भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. मागील वेळेस काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे यंदा गोव्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”
मोठी बातमी! निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर
‘उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ
“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”
Comments are closed.