गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास आयात करु- मनोहर पर्रिकर

पणजी | गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करु, असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले. ते मंगळवारी गोवा विधानसभेत बोलत होते.

भाजप आमदार निलेश कब्राल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळी त्यांनी गोव्यातील गोमांसाच्या व्यापाराची माहिती दिली.

गोव्यातील अधिकृत कत्तलखान्यांमधून दररोज २ हजार किलो गोमांस बाजारपेठेत उपलब्ध होते. उर्वरित गोमांस कर्नाटकमधून आयात केले जाते. तसेच इतर राज्यांतून गोव्यात जनावरे आणण्यावर सरकारने कोणतेही निर्बंध टाकलेले नाहीत, असेही पर्रिकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या