बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

NCBच्या क्रुझ पार्टीवरील कारवाईचं गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून स्वागत, म्हणाले…

पणजी | मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीनं धाड टाकली. एनसीबीनं मोठ्या शिताफिनं केलेल्या या छुप्या कारवाईची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. ही कारवाई करणाऱ्या एनसीबीच्या या टीमचं सगळीकडेच कौतुक होत आहे. पुढच्या कारवाईसाठी जर मदत लागली तर गोवा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कॉर्डेलिया क्रुझ पार्टीत केलेल्या कारवाईचं कौतुक केलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारणा केली असता, गरज पडली तर आम्ही एनसीबीला पूर्ण सहकार्य करू असं आश्वासन दिलं आहे. प्रमोद सावंत म्हणाले की, ‘एनसीबीने केलेल्या या कारवाईबद्दल राज्याला अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण या पार्टी प्रकरणातील कोणतीही लिंक गोव्यात आढळून आली तर त्यावरील कारवाईसाठी एनसीबीला सहकार्य केलं जाईल. ड्रग्ज व्यवहाराबाबत कोणतीही तडजोड गोवा सरकार करणार नाही.’

एनसीबीच्या या कारवाईचं उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही स्वागत केलं. ‘संबंधित यंत्रणा ड्रग्जच्या गैरव्यवहारावर लक्ष ठेवून आहे. गोव्याला ड्रग्जचा व्यवहार करणारे पर्यटक नकोच आहेत. राज्याकडून ते खपवून घेतलं जाणार नाही,’ असंही उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले. कॉर्डेलिया क्रुझ ही मुंबई ते गोवा या जलमार्गाने जाणार होती. पण प्रवास सुरू होण्या आधीच एनसीबीने सापळा रचत या पार्टीचा पर्दाफाश केला.

या प्रकरणात एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, मुनमुन धमेचासह 8 जणांना ताब्यात घेतलं. तर या सगळ्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड

”हा स्वातंत्र्याचा रक्त महोत्सव म्हणायचा का?” संजय राऊतांचा भाजप सरकारला संतप्त सवाल

‘एवढ्या मोठ्या क्रुझमध्ये फक्त आर्यन फिरत होता का?’ आर्यनच्या अटकेवर मिका सिंहचा सवाल

“प्रत्येक नागरिकाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी”

आज जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल; कोणाचं पारडं होणार जड?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More