Goa Election Result 2022: मनोहर पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला जोर का झटका
पणजी | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. गोवा छोटं राज्य असलं तरी गोव्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे गोव्यात सत्ता कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Goa Election Result 2022)
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत असताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.
उत्पल पर्रीकर हे पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीत आघाडीवर आहेत. उत्पल पर्रीकर सध्या भाजपचे (BJP) उमेदवार अटानासिओ मॉन्सेरेट आणि काँग्रेसचे (Congress) उमेदवार एल्विस गोम्स यांच्यापेक्षा ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत.
दरम्यान, भाजपवरील नाराजीमुळे उत्पल पर्रीकर पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले. उत्पल पर्रीकरांनी भाजपला ज्या जागेवरून तिकिट मागितलं होतं तिथून भाजपने दिलं नाही. त्यामुळे उत्पल यांनी बंडखोरी करत पणजीतून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता.
थोडक्यात बातम्या-
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा
“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
UP Election Result 2022: निकालापूर्वी अखिलेश यादव याचं ट्विट चर्चेत
“छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का?”
युद्ध सुरू असतानाच रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा!
Comments are closed.