बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दैव बलवत्तर! दरड कोसळली पण…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशभर पावसाने थैमान घातलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पहायला मिळतंय. उत्तरेकडील राज्यात काही ठिकाणी दरड कोसळल्याचं पहायला मिळतंय. अशीच एक घटना उत्तराखंड राज्यातील ऋषिकेशमधील घडली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋषिकेश – चंबा महामार्गावरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रस्ता पुर्णपणे रिकामा असतो. द्विभागी रस्ताच्या डाव्याबाजूने दोन तरूण येतात. त्याचवेळी उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरून दरड कोसळते. मात्र, दुचाकीवरून जात असलेले तरूण थोडक्यात बचावले.

दरड कोसळत असल्याचं दोघांना कळतं. त्यानंतर दुचाकी चालक गाडीचा स्पीड वाढवतो. काही सेंकदाच्या आत गाडी पुढे जाते आणि मागे दरड कोसळली. हा सर्व प्रकार ऐवढी झटपट झाला की व्हिडीओ पहाणाऱ्यांना देखील धक्का बसला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याच्या घटना दररोज घडत असतात. आता उत्तराखंडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातून जाताना काळजी घेणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत वाढ; सोमय्यांना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप खासदाराच्या सुनेचा थेट चाकणकरांना फोन, म्हणाल्या, ‘प्लीज ताई माझी सुटका करा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More