बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली अन् मी भाजपमध्ये आलो”

अहमदनगर | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली तर काँग्रेस पक्षाला एकाही राज्यात चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मी परमेश्वराचे आभार मानतो की, मला दुरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं भाजपमध्ये आलो, असं म्हणत सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. राहुरी येथे वयोश्री योजनेतून मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

महाराष्ट्र काँग्रेस पक्ष लाचार बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी आहे. काँग्रेसने आता 40 ने शुन्य होण्याची वाट पहावी आणि नवी सुरूवात करावी, असा खोचक टोला सुजय विखे यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना सुजय विखे यांनी शिवसेनेवर देखील टीकेचे बाण सोडले.

दरम्यान, गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला कमी मते मिळाल्याने शिवसेनेची स्पर्धा ही नोटाबरोबर असल्याचं गोवा आणि उत्तर प्रदेशात पहायला मिळालं. ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. त्यांचे प्रभारी हे रोज बोलतात, त्यांना पाहून गोव्याच्या जनतेने त्यांना नाकारलं आहे, अशी टीका सुजय विखे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटीस

“माझी आई माझ्या घरी राहते, मी कॅमेरावाल्यांना घेऊन आईला भेटत नाही”

“‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी साठी रवाना, झुकेगा नहीं साला”

“सेक्सी आणि हॉट म्हणून ओळखलं जाणं मला आवडतं”

पुतिन यांनी मोडला तब्बल 70 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More