देश

साक्षात प्रभू रामचंद्र आले तरीही बलात्कार थांबवता येणार नाहीत- भाजप आमदार

लखनऊ | साक्षात प्रभू रामचंद्र आले तरीही बलात्कारासारख्या घटना थांबवता येणार नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजप आमदाराने केलं आहे. सुरेंद्र सिंह असं या भाजप आमदाराचं नाव आहे.

वाढत्या बलात्काराच्या घटनांविषयी त्यांना विचारण्यात आलं होतं. मी छातीठोकपणे सांगतो, आजच्या काळात प्रभू रामचंद्र जरी असते तरी बलात्कार थांबवता आले नसते, कारण हे नैसर्गिक प्रदूषण आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, या अगोदरही सुरेंद्र सिंह यांनी या प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली होती. मात्र त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या–

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!

-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे

-मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या एक पाऊल पुढे होता- संभाजी भिडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या