बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…

पालघर | मागील काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातलं होतं. त्यामुळे अनेका भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. तर अनेक ठिकाणी रस्ते देखील खचले आहेत. त्याचबरोबर अनेक भागात झाडं पडल्यानं रस्ते बंद झाले आहेत. त्यातच आता अशीच एक घटना पालघरमध्ये घडली आहे. मृत्युच्या दारात आलेला रिक्षाचालक थोडक्यात वाचला आहे.

पालघरमध्ये हाॅटेल विसावा हे मोठं रिसाॅर्ट आहे. या रिसाॅर्टमधील एका प्रवाशाला नेण्यास एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन रिसाॅर्टजवळ पोहोचला. 26 जुलै दुपारच्या 4 वाजताची ही वेळ. प्रवासी हाॅटेलमधून बाहेर येणार असल्यानं रिक्षाचालकानं रिक्षा बाजूला उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानं रिक्षा बाजूला लावली. त्याच्या शेजारी नारळाचं झाड होतं. पावसामुळे ते मोडकळीस आलं होतं. खाली रिक्षात केवळ रिक्षाचालक होता.

चालकाने रिक्षा पार्क करत असताना झाड खाली येऊ लागलं. रिक्षा बरोबर झाडा खाली आलं आणि झाड रिक्षावर कोसळलं. रिक्षाचालकाने किंचीत रिक्षा पुढे घेतली होती. त्यामुळे झाड रिक्षाच्या मागील बाजूस पडलं. 3 ते 5 इंचाच्या फरकाने रिक्षावाला वाचला. झाड खाली पडल्यानं त्यानं रिक्षाचालक तात्काळ बाहेर निघाला. त्यामुऴे रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. पण रिक्षाचं मोठं नुकसान झालं.

दरम्यान, हा सर्व व्हिडीओ रिसाॅर्टच्या सीसीटिव्हीत कैद झाला आहे. हे प्रकरण रिसाॅर्टच्या मालकाला समजल्यावर मालकाने रिक्षावाल्याला 6 हजारांची मदत केली आहे. तर रिक्षा गॅरेजमध्ये पाठवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; दररोज 15 हजार थाळ्या पुरवणार

आसाम-मिझोराम वाद चिघळला; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे ताजे दर

शेतकऱ्याला राग अनावर; भररस्त्यात भाजप नेत्याचे कपडे फाडले, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More