औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेतलेल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. कोयगाव टोका इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. काकासाहेब शिंदे असं या तरुणाचं नाव असल्याचं कळतंय.
नव्या पुलावरुन या तरुणाने नदीपात्रात उडी मारली होती. जुन्या पुलापर्यंत हा तरुण वाहात गेला. जीवरक्षक पथकातील दशरथ बिरुटे यांनी त्याला बाहेर काढलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी गंगापुर तहसील कार्यालयात जलसमाधीसंदर्भात निवेदन दिलं होतं. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची दखलच घेतली नसल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!
-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार
-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी