Top News

गोगावले पुण्याचे पालकमंत्री तर अमित शहा पंतप्रधान, रावसाहेब दानवेंचा ‘गोंधळचं गोंधळ’!

पुणे | आज झालेल्या पुण्याच्या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाषण करताना चांगलेच गोंधळले. त्यांनी अमित शहा यांचा भारताचे पंतप्रधान तर पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री म्हणून केला.

दानवे यांची जालना लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा आज सकाळपासून चालू आहे. त्यामुळेचं रावसाहेब दानवे त्या तणावाखाली होते का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामीण ढंगातील वक्तृत्वशैली हे त्यांचे वेगळेपण आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सभांमध्ये त्यांची भाषणे जोरदार होतात. भाषण करताना संदर्भ चुकणे, नामोल्लेख चुकणे, या गोष्टी त्यांच्याबाबत बऱ्याचवेळा घडतात.

दरम्यान, पक्षाध्यक्ष अमित शहा आज पुण्यात आले होते. त्यामुळे दानवे एकप्रकारे मानसिक तणावाखाली होते. त्यामुळेचं त्यांच्याकडून भाषणात चुकीचे उल्लेख झाले असावेत, अशी पक्ष वर्तूळात चर्चा सुरू झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांची ‘बारामती’ जिंकण्याची वल्गणा, राष्ट्रवादीला झाली बेडकाच्या गोष्टीची आठवण!

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पवार कुटुंबिय लक्ष्य!

-“राज ठाकरेे काही प्रश्नावर आमच्या सोबत मात्र आगामी निवडणुकीत….”!

“काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका”

-“भाजप नेत्यांनो माझ्या तब्येतीची काळजी करू”, शरद पवार माढा लोकसभा लढणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या