बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झाल्यानंतर पडतंय टक्कल? वाचा लाँग कोविडचे साईडइफेक्ट

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढणारी कोरोना रुग्णसंख्या ही आता हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. पण आता हळूहळू कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर देखील लाँग कोविड धोका असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं होतं. त्यातच आता कोरोना झाल्यानंतर टक्कल पडतं का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

कोरोना झाल्यानंतर मधुमेहाचा धोका असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोरोनानंतर काही जण म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराला देखील बळी पडले होते. तर दुसरीकडे कोरोना झाल्यानंतर लठ्ठपणा देखील वाढत असल्याच्या केसेस वाढल्या होत्या. त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवा दुष्परिणाम समोर आला आहे. कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांना टक्कल पडत असल्याचं आता समोर आलं आहे.

अनेक जणांना कोरोना होऊन गेल्यावर केस गळत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. कोरोनानंतर केस गळण्याच्या आणि टक्कल पडण्याच्या तक्रारी तुलनेनं कमी आहेत. कोरोना काळानंतर अनेकांना जेवण जात नसल्याचं डाॅक्टरांनी सांगितलंय, त्यामुळे शरिराला मिळणारं पोषक अन्न कमी पडत असल्यानं शरिरात थकवा, सारखी झोप लागणे, अंगदुखी अशा समस्या उद्भवत आहेत.

दरम्यान, कोरोना झाल्यानंतर शरिरातील हाडे ठिसूळ होत आहेत. तर काहींच्या शरिरातील हाडे डेड झाल्याचा रोग म्हणजेच अवैस्क्यूलर नैक्रोसिस हा आजार देखील झालेला पाहायला मिळाला आहे. तर काहीना किडण्यांवर परिणाम झाल्याचं देखिल समोर आलं होतं. या सर्व साईडइफेक्टमुळे कोरोना प्रतिबंधक लस घेणं महत्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्र सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलं’, आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचं ‘हे’ प्रत्यूत्तर

मुंबई महापालिकेत ‘भाजप मनसेला टाळी’ देणार का? ; आशिष शेलार यांचं स्पष्ट उत्तर

आता घरबसल्या करता येणार कोरोना चाचणी; अवघ्या 325 रुपयांत होणार चाचणी

सकारात्मक बातमी! ‘या’ राज्यात आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

भाजपला मोठा धक्का! आत्तापर्यंत 105 मुंडे समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More