बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत जाताय?; प्रवेशासाठी ‘ही’ नवी नियमावली जारी

रत्नागिरी | कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्व परिस्थिती बदलली आहे. सण, उत्सव साजरे करताना कोरोना नियम पाळण्याची गरज आहे. गणेशोत्सव असल्याने राज्यभरातून कोकणात चाकरमाने येत असतात. परिणामी कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात येत असते. त्यामुळे आता राज्य प्रशासन याबाबत तयारी करताना दिसत आहे.

कोकणात येणाऱ्या व कोकणात असणाऱ्या सर्वांसाठी कोरोना नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं गणेशोत्सवासाठी आता नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये आता गणेशोत्सवासाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. टेस्टचे रिपोर्ट 72 तासांपूर्वीचे असणं बंधनकारक असणार आहे.

नियमावलीनुसार पुढील नियम जारी करण्यात आले आहेत-

  1. दोन डोस झालेले नसल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.
  2. 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.
  3. दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश मिळेल.
  4. जिल्ह्यात व प्रवेश केल्यानंतर मास्क घालणे सक्तीचं असणार आहे.
  5. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतर राखणं आवश्यक आहे.
  6. एकाचं ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करण्यास मनाई असेल. या नियमांच्या माध्यमातून प्रशासन गणेशोत्सवावर लक्ष ठेवून असेल.

दरम्यान, कोरोना वाढत असल्यानं कोकणात सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. ज्या व्यक्तीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशा व्यक्तीला मात्र हा रिपोर्ट लागू असणार नाही. त्यामुळे लस घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या 

आता अजित पवार यांच्याबद्दल नारायण राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची दहशत, ‘या’ पाच जिल्ह्यांनी महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं!

…तर सरकारने अनिल परब यांना स्वत: हून अटक करावी- चंद्रकांत पाटील

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

“संस्कार आणि संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आलं की हात वर करायचे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More