बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका”

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीवरून उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रतही दिसत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीवरून भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेश निवडणूक ही साधीसुधी नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याने ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफिल राहू नये. तुम्ही आज जे ठरविणार आहात तेच तुमच भविष्य असणार आहे. तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. हे सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी माझे भाषण उत्तरप्रदेशात व्हायरल करा, असं म्हटलं आहे.

माझ्यावर बुलंदशहर येथील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तरप्रदेशात जाऊन भाजपविरोधात जाऊन प्रचार करणार आहे. काही जण भाजपची सुपारी घेवून उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फुट पाडण्यासाठी खेळी सुरू आहे. त्यापासून सावध राहा, स्वत:ची अक्कल लावा, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीवर देशातील पुढील रणनीती अवलंबून असणार आहे. देशात काय होणार काय नाही हे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीवर अवलंबून आहे. 2024 मध्ये कोण सत्तेत बसणार ते ही निवडणूक ठरवते. त्यामुळे कोणाला मतदान करायचे हे मी सांगणार नाही, भाजपाला हरवा, हे तुम्ही उत्तरप्रदेशमध्ये जाऊन लोकांना सांगा. मी स्वत: उत्तर प्रदेशात जाऊन भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचं यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

विद्यार्थ्यांच्या आंदोनलनानंतर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

“मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू अन् काय देव पावलाय गं”; भाजप प्रवक्त्याचं सरकारवर टीकास्त्र

‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’; गिरीश बापटांच्या वक्तव्याची एकच चर्चा

ऑफलाईन परीक्षेवरून वाद पेटला, वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; किरीट सोमय्यांचा खोचक सवाल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More