बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोराच्या फार जवळ जाणं अंगलट, ‘या’ अभिनेत्रीच्या थेट अंगावरच मारली उडी!

मुंबई | बिग बाॅस फेम मधील चर्चेत असलेली अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशी हीचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. अलीकडे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणाची कला, कधी कोणाचा प्राण्यासोबतचा स्टंट, असे बरेचं व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाप्रकारेच या अभिनेत्रीचा मोरा सोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये एका मोराने अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशीवर हल्ला केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री अतिशय शांतपणे मोराला काहीही न करत त्याची सुंदरता न्याहाळताना दिसतेय. मात्र तिचं असं पाहणं मोराच्या पसंतीस पडत नाही आणि ती मोराला पाहत असतानाच अचानक मोर अभिनेत्रीवर हल्ला करतो.

हा व्हिडीओ फोटोग्राफर विरल भैयानीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरुन शेअर केला आहे. दिगांगनाला मोराला जवळून पाहणं चांगलंच महागात पडलं असून दिगांगना मोराच्या अगदी जवळ उभी होती. मोरही अगदी शांतपणे फिरत होता. मात्र अभिनेत्री मोराच्या काहीशी जवळ जात असतानाच मोराने उडी मारुन तिच्यावर हल्ला केला.

दरम्यान, या संपुर्ण प्रकारादरम्यान अभिनेत्रीची आई देखील बाजूलाच उभी आहे. मोराने हल्ला करताच त्या लगेच आपल्या मुलीच्या जवळ जाऊन मोराला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्स अनेक कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या-

खेसारीलालच्या नव्या गाण्यानं केला कहर, काही तासात 4 कोटी व्ह्यूज!

असापण फ्रॅाड!; फेसबुक लाईव्ह केलं तर एका झटक्यात 26 हजारावरुन बिलाची रक्कम झाली 6 हजार!

“महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॅाकशाही’ आहे, 2 मे ला सर्वांना धक्का बसेल”

शिवसेनेनं भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपुढे ठेवला ‘हा’ नवा पर्याय!

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More