मुंबई | कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने अनेक लहान उद्योजकांच्या उद्योगाला खीळ बसली. केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. फक्त लहान उद्योजकांनाच याचा फटका बसला नसून मोठ्या कंपन्यांनासुद्धा बसला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
गोकूळ दुध उत्पादक कंपनीलाही आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर दुधाची मागणी घटल्याचं समोर आलं आहे म्हणून गोकूळ दुध उत्पादक कंपनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गोकुळची विक्री फक्त 7 लाखांवर आली आहे. यामुळे दूध संघासमोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत त्यामुळे रोज पाच लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय गोकूळ व्यवस्थापनाने घेतला आहे.
दरम्यान, कोरोनाची भीती आणि पोलिसांच्या धाकाला घाबरुन अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. मालाची नेआण करण्यास माणसं नसल्याची परिस्थिती अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन
आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत
महत्वाच्या बातम्या-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपणॉ
सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!
Comments are closed.