गोकूळकडून दुधाच्या खरेदी दरात कपात, शेतकऱ्यांना मोठा झटका!

कोल्हापूर | गोकुळ या दुधाच्या ब्रँडने दुधाच्या खरेदी दरात 2 रुपयांची कपात केलीय. त्यामुळे गोकुळच्या डेअरींना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा झटका बसलाय. 

गोकूळ दूध संघाकडून गायीच्या एक लिटर दुधाला 28 रुपये 50 पैसे दिले जात होते, मात्र आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना 26 रुपये 50 पैसे मिळणार आहेत. अतिरिक्त दुधामुळे हा निर्णय घेतल्याचं कळतंय. 

दरम्यान, दुधाच्या खरेदी दरात कपात करण्यात आली असली तरी विक्री दर मात्र कोणतीही वाढ किंवा कपात करण्यात आलेली नाहीत. ग्राहकांना ते 45 रुपये लिटरनेच मिळणार आहे.