Gokul Zirwal | विधानसभा निवडणुकीचं राज्यात लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अगदी घरोघरी जाऊन विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते काम करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अशी परिस्थिती पुन्हा एकदा विधानसभेत होऊ नये आता यासाठी महाविकास आघाडी कंबर कसून आहेत. मात्र अशातच आता अजितदादा गटाच्या आमदाराच्या मुलाने थेट आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्य केलं आहे. तसेच मी छाती फाडली तर शरद पवार दिसतील असं वक्तव्य गोकुळ झिरवळ (Gokul Zirwal) यांनी केलं आहे. तसेच नुकत्याच झालेल्या शरदचंद्र पवार गटाच्या नाशिक येथील मेळाव्याला गोकुळ झिरवळ (Gokul Zirwal) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
“कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं”
नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. ते आपले वडील नरहरी झिरवळ यांच्याविरोधात लढणार असल्याचं स्वत: गोकुळ झिरवळकर म्हणाले आहेत. पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढण्यास तयार असल्याचं वक्तव्य नरहरी झिरवळ (Gokul Zirwal) यांनी केलं.
“दिंडोरी मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक”
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मेळावा होता. यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी गोकुळ झिरवळ देखील त्याठिकाणी उपस्थित होते. गोकुळ झिरवळ हे दिंडोरी मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. याचपार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ (Gokul Zirwal) काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून गोकुळ झिरवळ हे निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. ते लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यांच्याऐवजी दिंडोरी मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
News Title – Gokul Zirwal Son Of Ajit Pawar NCP MLA Narhari Zirwal Marathi News Update
महत्त्वाच्या बातम्या
“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल
गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी
“बजेट देशाचं की बिहार-आंध्र प्रदेशचं?”; अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया