आनंदाची बातमी! सोनं चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मुंबई | सोन्या (Gold) चांदीच्या (Silver) दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. सोन्या चांदीच्या दरात आता घसरण झाली असून सोनं चांदी स्वस्त झालं आहे.

दोन दिवसांनतर सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर आजच करा. कारण सोनं तब्बल 300 तर चांदीचे दर 1000 रुपयांनी घसरले आहेत. 

भारतीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आजच्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबरला सोने आणि चांदीचे दर घसरणीसह व्यापार करत आहेत.

1.50 टक्के चांदीचे भाव वायदे बाजारात उतरले आहेत. दरम्यान बुधवारी एमसीएक्सवर सोने 0.12 आणि चांदी  0.73 टक्क्यांनी उतरले.

वायदे बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 54,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीपेक्षा सकाळी 9:10 वाजेपर्यंत 310 रुपयांनी कमी होता.

आज सोन्याचा भाव 53,481 रुपयांवर खुला होता. मौल्यवान धातू काल 54,678 रुपयांवर बंद झाला होता, जो त्याच्या आधीच्या बंदच्या तुलनेत 65 रुपयांनी कमी होता.

थोडक्यात बातम्या-

बॅंकेत खाते उघडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान

iPhone वापरणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज!

मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

‘या’ टीप्स फाॅलो केल्या तर हिवाळ्यात होणाऱ्या संक्रमणांपासून होऊ शकतो बचाव

मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा सरकारला इशारा, म्हणाले…