बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्या चांदीचे दर पुन्हा उतरले; वाचा आजचे ताजे दर

मुंबई | जगातील बाजारपेठांपैकी भारत ही सोन्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. भारतात सोन्याच्या वस्तूंना मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यातच आता सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत.

नफा वसुलीने सोने आणि चांदीला मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारात चालू असलेल्या घडामोडींचा परिणाम कमोडिटी मार्केटवर पडताना दिसतोय. त्यामुळे आता सोन्याचा भाव पुन्हा 47 हजाराच्या खाली घसरला आहे. सोन्याच्या भावात 225 रूपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव 47869 वर स्थिरावला आहे. त्याआधी कमाॅडिटी मार्केट खाली गेले असताना सोन्याचा भाव 47,771 पर्यंत खाली आला होता.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण होताना दिसतेय. मंगळवारी चांदीच्या दरात 649 रूपयांची घट झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 66,597 रुपयांपर्यंत खाली आला आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरियएंटने डोकंवर काढलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बाॅण्डयिल्डमध्ये घसरण झालेली दिसत आहे. त्याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेत होताना दिसतोय.

दरम्यान, सध्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,310 रूपयांवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,310 आहे. मुंबईपेक्षा चेन्नईत 24 कॅरेट सोन्याची किंमत वाढली आहे. सध्या सोन्याच्या किंमती घसरत असल्या तरी काॅमेक्समध्ये सोन्याच्या किंमती 0.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More