सोन्याच्या खरेदीचा धडाका; RBI ने जानेवारीत खरेदी केले ‘इतके’ टन सोनं

RBI Gold

RBI Gold l मुंबईत सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत असतानाच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोने खरेदी सुरूच ठेवली आहे. डिसेंबर 2024 मध्ये 11 महिन्यांच्या खरेदीनंतर विश्रांती घेतली होती, मात्र जानेवारी 2025 मध्ये पुन्हा एकदा 2.8 टन सोने खरेदी केले. यामुळे देशाचा सोन्याचा साठा 879.01 टनांवर पोहोचला आहे.

RBI ची सोने खरेदी :

2 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा सोन्याचा साठा 812.33 टन होता. गेल्या वर्षी आरबीआयने 72.6 टन सोने खरेदी केले होते. भारत आणि चीनसह (Chain) अनेक देश सोन्याचे साठे वाढवत आहेत. महागाईपासून (Inflation) संरक्षण आणि परकीय चलन साठ्यात स्थिरता आणण्यासाठी सोन्यामुळे मदत होते. आरबीआयने सलग सातव्या वर्षी सोन्याचा साठा वाढवला आहे. गेल्या वर्षी बँकेने 72.6 टन सोने खरेदी केले. 2009 नंतर आरबीआयची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी खरेदी ठरली. 2021 मध्ये 77 टन आणि 2009 मध्ये 200 टन सोने खरेदी केले होते.

RBI Gold l सोन्याच्या किमतीत उच्चांक :

यंदा भारतात सोन्याच्या किमतींमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे, तर जागतिक बाजारात 10 टक्के वाढ झाली. रुपयाच्या घसरणीमुळे भारतात सोन्याच्या किमती अधिक वाढल्या. रुपया अमेरिकी डॉलरच्या (Dollar) तुलनेत 1 टक्क्याहून अधिक घसरला आहे.

साठा कशामुळे वाढला? :

तज्ज्ञांच्या मते, बदलत्या भूराजकीय परिस्थितीमुळे भारतासारखी विकसनशील राष्ट्र सोन्याचा साठा वाढवत आहेत. रिझर्व्हचे डायव्हर्सिफिकेशन अर्थात विविधता वाढविण्यासाठी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा वाढवला जात आहे. परकीय गुंतवणूकदारांची विक्री व रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा साठा वाढवणे महत्त्वाचे आहे. आरबीआयच्या परकीय चलन साठ्यात हा वाटा 11.31 इतका आहे.

चीनच्या (Chain) केंद्रीय बँकेनेही जानेवारीत सलग तिसऱ्या महिन्यात सोने खरेदी केले. पीपल्स बँक ऑफ चायनाने जानेवारीत 5 टन सोने खरेदी केले. यामुळे चीनचा एकूण सोन्याचा साठा 2,285 टनांवर पोहोचला. तीन महिन्यांत चीनच्या बँकेने 20 टन सोने खरेदी केले.

News Title: Gold Buying Spree Continues: RBI Adds 2.8 Tonnes in January

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .