बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

मुंबई | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले काही दिवस सोन्याचे दर स्थिर होते. मात्र कालपासून सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या दोन दिवसात 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 580 रुपयांची घट झाली आहे. 580 रुपयांच्या घटीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा दर 47 हजार 490 रुपये प्रती तोळा आहे.

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 1000 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या मुंबईतील सराफा बाजारात चांदीचा दर 64 हजार 600 रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! लसीकरणानंतर देखील ‘या’ देशात पाचव्या लाटेची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More