मुंबई | बॉलिवूडमधील खिलाडी अक्षयचा कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल 27 कोटी रुपये इतकी झाली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाची कमाई शेअर केली आहे.
‘गोल्ड’सोबत जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र सत्यमेव जयते या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 20 कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे गोल्ड या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, 1948 मध्ये भारताने पहिल्यांदा स्वतंत्र देश म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. भारताने इंग्रजांना त्यांच्याच जमिनीवर हॉकी खेळून मात दिली, यावर हा चित्रपट आधारित आहे.
The BIG HOLIDAY [#IndependenceDay] results in BIG NUMBERS at the BO… Both, #Gold and #SatyamevaJayate have TERRIFIC Day 1… Both, Akshay and John record their HIGHEST *Day 1* biz… The *combined* total is approx ₹ 45 cr [+/-], which is HUMONGOUS… Yesss, BO is on 🔥🔥🔥
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-अटलजींच्या निधनाचं वृत्त; दूरदर्शननं मागितली माफी
-नवाजु्द्दीन सिद्धीकीच्या ‘मंटो’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
-…म्हणून रणवीर-दीपिकाच्या लग्नात मोबाईल नेण्यास बंदी!
-अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता आजार आहे?
-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!