बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या वायदे बाजारात तेजी, चांदी देखील वाढली; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोनं घालून मिरवणं एवढंच नव्हे, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देतात. अलिकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

एमसीएक्सवर आज देखील सोने चांदीच्या वायदे किंमतीत तेजी दिसून आली आहे. आज सकाळी 11:07 वाजता ऑगस्ट 2021 मधील सोन्याची वायदा किंमत 146 रुपयांनी वाढून 47 हजार 71 रुपये प्रति तोळा झाली. एमसीएक्सवर ऑक्टोबरमध्ये डिलिवरी होणाऱ्या सोन्याची किंमत 182 रुपयांच्या वाढीसह 47 हजार 391 रुपये प्रती तोळा होती.

तसेच आज एमसीएक्सवर जुलै 2021 मधील चांदीचा भाव 403 रुपयांनी वाढून 68 हजार 276 रुपये प्रती किलोवर होता. यापुर्वीच्या सत्रात जुलै मधील चांदीचा भाव 67 हजार 873 रुपये प्रती किलो होता.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

भारतात राष्ट्रपतींना खरंच शिक्षकांपेक्षाही कमी पगार मिळतोय?; हे वाचून कळेल वास्तव काय!

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

निशाने करण मेहराच्या परिवारावर केला गुन्हा दाखल, धक्कादायक कारण आलं समोर

“राज्य सरकार कोरोनाची दहशत पसरवत जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी लादत आहे”

‘विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं हा तसाच प्रकार’; नाथाभाऊंचं फडणवीसांवर टीकास्त्र

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More