बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरज चोप्राने पूर्ण केलं भारताचं सोनेरी स्वप्न, भालाफेकमध्ये सुवर्णपदक!

टोकियो | टोकियो ऑलिम्पिकचा अखरेचा दिवस भारतासाठी सोनेरी ठरला आहे. 2021 साली ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. नीरज चोप्रामुळे भारताचा सुवर्णपदकाचा 12 वर्षाचा दुष्काळ संपला आहे.

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली. दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि अखेर त्याने सुवर्णपदकावर नाव कोरलं.

ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावलं होतं. नीरज चोप्रा हा भालापेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारा पहिला खेळाडू झाला आहे.

दरम्यान, भारताला आज दोन पदक मिळालीत यामध्ये बजरंग पुनियाने कांस्य तर नीरजने सुवर्ण. भारताच्या खात्यात एकूण सात पदके आली आहेत.

थोडक्यात बातम्या-

नीरज चोप्राने पूर्ण केलं भारताचं सोनेरी स्वप्न, भालाफेकमध्ये सुवर्णपदक!

महापौरांच्या कार्यालयात भूत? गार्डसोबत घडला भयानक प्रकार, महापौरांनीच शेअर केला व्हिडीओ!

वाह रे पठ्या! बजरंगने मिळवलं कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर एकहाती विजय

खळबळजनक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

पॉर्न पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव, पत्नीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More