बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | कोणताही सण म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे.  मात्र, सध्या सोन्याचा दर सार्वकालिक उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 400 रुपये प्रती तोळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 400 रुपये प्रती तोळा आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील गेल्या काही दिवसात मोठी चढउतार पाहायला मिळत आहेत. आज प्रती किलो चांदीचा दर 70 हजार रुपये आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी केले मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनाम्याच्या चर्चेवर रावसाहेब दानवे म्हणाले…

“मंत्र्यांच्या राजीनाम्यामागे परफॉर्मन्स हाच निकष असेल, तर पंतप्रधान मोदींनाही हटवा”

धक्कादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आणखी एक व्हेरिएंट आला समोर

“सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शहा, बाकी संगीत खुर्ची”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More