बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे बप्पी लाहिरी घालायचे सोन्याचे दागिने!

मुंबई | प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बप्पी यांनी 48 वर्षे गाणी गायली. त्यांनी त्यांच्या गायनातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्णाण केली आहे.

बप्पी यांनी 500 चित्रपटांमध्ये संगीतकार आणि गायक म्हणून काम केलं आहे. त्यांनी 5000 पेक्षाही अधिक गाणी गायली आहेत. तसेच बप्पी दा हे त्यांच्या दागिन्यांमुळे सतत चर्चेत असायचे. त्यांना सोन्याच्या दागिन्यांची प्रचंड आवड होती. बप्पी यांनी दागिने घालण्यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बप्पी दा हे अमेरिकन स्टार एल्विस प्रेस्लीचे खूप मोठे चाहते होते. एल्विसला हे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सोन्याची चैन घालायचे. त्यांना पाहून बप्पी यांनी निश्चय केला की, जेव्हा मी यशस्वी होईन, तेव्हा मी खूप सोने घालीन, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बप्पी हे यशस्वी झाल्यावर त्यांनी खूप सोनं अंगावर घातलं. त्यामुळे त्यांना भारताचा गोल्ड मॅन म्हणून ओळखलं जातं. बप्पी यांच्यासाठी सोनं हे खूप भाग्यवान ठरलं होतं. त्यामुळे ते सतत सोनं घालून असायचे. त्यांनी कधीच सोने घालायचे सोडले नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, बप्पी दा यांच्या पत्नी चित्रानी यांनाही सोनं घालण्याची खूप आवड आहे. 50 लाखांचे सोने बप्पी यांच्याकडे होते. तर 967 ग्रॅम सोने, 8.9 किलो चांदी आणि 4 लाख रूपये अधिक किंमतीचे हिरे माझ्याकडे आहे, असं बप्पी दा यांच्या पत्नी चित्रानी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा

अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, ताब्यात घेतलेल्या तरूणाने केला खळबळजनक दावा

अमृता फडणवीसांनी राऊतांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘मामी गप्प बसा’

‘… तर हो मी ब्लॅकमेलर आहे’ -किरीट सोमय्या

“जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More