गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात वाढ, वाचा ताजे दर
मुंबई | गेले दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता तब्बल 2 वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा जल्लोषात साजरा होणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,100 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,470 इतका आहे.
पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 48,180 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52,550 इतकी आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 68 हजार 807 रुपये एवढा आहे. चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे.
भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू
Gudi Padwa 2022 : 2 वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त गुढीपाडवा
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
“राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी….”
“गृहखाते शिवसेनेकडे दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील”
Comments are closed.