Top News मुंबई

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोनं 50 हजारांच्या पार

मुंबई | लग्न सराईच्या ऐन मोसमात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्यासाठी आता मुंबईकरांना प्रतितोळा तब्बल 50 हजार 282 रुपये मोजावे लागणार आहे. यात अजून भर म्हणजे जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटी पकडून 51 हजार 782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे.

सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा 10 ग्रॅमसाठी दर 48 हजार 886 रुपये इतका होता. यामध्ये आज जवळपास 1400 रुपयांची वाढ होऊन दर 50 हजार 282 रुपये इतका झालाय. शिवाय येत्या दसऱ्यापर्यंत सोन्याचा भाव 55 ते 56 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात आलीये.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जगभरात मंदीचं सावट आहे. अशातच अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतायत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीने आठ वर्षांच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केलीये.

कोरोनाच्या महामारीचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात अजून मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या देशात सोन्याची आयात कमी प्रमाणात झालीये. शिवाय जगभरात सोन्याच्या ज्या खाणी आहेत, तिथेही कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे कामगारांची संख्या कमी आहे. या सर्व बाबींचा परिणाम सोन्याचे दर वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

फडणवीसांनी दोन तासात कितीतरी प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची पोलिसांकडून होणार चौकशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या