बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संधी दवडू नका’; सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ हजारांची मोठी घसरण!…

नवी दिल्ली | सोने आणि चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठी घसरण होत असल्याची पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात जवळपास 12 हजारांहून जास्त रूपयांची घसरण झालेली असताना गुरुवारीदेखील सोन्याच्या दरात 217 रूपये प्रती 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. या नव्या घसरणीनुसार सोन्याचा दर आता  44,372 रुपयांवर पोहचला आहे.  एकिकडे सोन्याच्या दरात घसरण होत असताना चांदीचा दर  मागील काही महिन्यात वधारल्याचा पहायला मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा चांदीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.

बुलियन मार्के़टमध्ये चांदीची किंमत 67 हजारांच्याही खाली आली आहे. विशेष म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असतानाही सोने आणि चांदीच्या दरात घट आढळून आली आहे. कॉम्प्लेक्स गोल्ड प्राईजेसमध्ये घसरण झाल्यानं सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 217 रूपयांची तर चांदीच्या दरात 1217 रूपये प्रति किलोची घसरण झाली आहे. भारतात सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण होत असताना जागतिक बाजारपेठेत मात्र सोने चांदीचे दर वधारल्याचे पहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1717 डॉलर्स तर चांदीच्या दरातही बरीच वाढ दिसून आली.

दरम्यान सोने चांदीच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांसाठी चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनाच्या काळात नागरिकांना आर्थिक फटका बसलेला असताना सोने चांदीच्या घसरणीनं मात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या –

माझा काहीही संबंध नाही, अखेर पूजा चव्हाण प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीनं मौन सोडलं!

बुधवारनंतर गुरुवारी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More