Gold Rate l सोन्याचे दर कमी होणार, अशा चर्चांना आजच्या घडामोडींनी जोरदार छेद दिला आहे. नाशिक सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल ₹1160 ची उसळी पाहायला मिळाली असून, २४ कॅरेट सोन्याचा दर थेट ₹93,860 प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. या दरवाढीने सर्वसामान्य ग्राहक आणि विशेषतः लग्नसराईतील खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. (Gold Rate)
एप्रिलच्या सुरुवातीला घट, आता अचानक उसळी :
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर (Gold Rate) काहीसे कमी झाले होते आणि 90 हजारांच्या घरात स्थिरावले होते. मात्र, मागील दोन दिवसांत सोन्याने पुन्हा विक्रमी झेप घेतली आहे. कालच म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सोनं ₹210 ने महागलं होतं. त्यानंतर आज ₹1160 ची वाढ नोंदवण्यात आली.
Gold Rate l आजचे दर :
24 कॅरेट सोनं: ₹9386 प्रति ग्रॅम
22 कॅरेट सोनं: ₹8965 प्रति ग्रॅम
10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं: ₹93,860
चांदीचा दर: ₹97,000 प्रति किलो (घसरणीसह)
आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम :
अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावरही झाला असून, सोन्या-चांदीच्या दरांत चढ-उतार सुरू आहेत. सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. (Gold Rate)
ऐन लग्नसराईच्या हंगामात, अशी दरवाढ होणं सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक ठरत आहे. अनेकांनी आपली खरेदी थांबवली असून, काहींनी तातडीने खरेदी करून दरवाढीपूर्वीची किंमत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.