मुंबई | गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे (GOLD)भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता रशिया युक्रेन युद्धानं (Russia-Ukraine War) आंतराष्ट्रीय बाजारात खळबळ माजवली आहे. याचे परिणाम भारतावरही होत असलेले दिसत आहे.
आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 41 रुपये स्वस्त झालं आहे. या घसरणीसह सोनं आज सकाळी 51330.00 रुपयांवर ट्रेड(Gold Price Today) करत आहे. चांदीचा भावही (Silver Price Today) आज कमी झाला आहे.
चांदीचा दर 222 रुपयांनी कमी झाला असून चांदी 65976.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळे सध्या खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
थोडक्यात बातम्या –
BREAKING | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट, चर्चांना उधान
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात
राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय
कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
Comments are closed.